फरार आरोपींना अटक; गावठी कट्ट्यांसह ७ जिवंत काडतुसे जप्त

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरात ३० ऑगस्ट विशाल राजेंद्र पाटील (वय २२) या तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील फरार तीन आरोपींना पाचोरा पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान त्यांच्याकडून लोखंडी चॉपरसह गावठी बनावटीचे दोन पिस्टल (कट्टे) व ७ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील निलम कट्टा भागात रोडवर विशाल पाटील यांच्यावर चंद्रकांत सुर्यकांत नाईक, अविनाश सुर्यकांत नाईक व निलेश अनिल सोनवणे (सर्व रा. पाचोरा जि. जळगाव) यांनी विशालवर लोखंडी चॉपरने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला होता. गुन्हा केल्यापासून तिघंही जण फरार होते. दरम्यान त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, आरोपींकडुन गावठी बनावटीचे दोन पिस्टल (कट्टे) व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

यांनी केली कारवाई
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस उप निरीक्षक गणेश चोभे, पोलीस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे, विनोद पाटील, दिपक सुरवाडे, नंदकुमार जगताप, विश्वास देशमुख, पोलीस शिपाई किरण पाटील, किशोर पाटील, विनोद बेलदार, स.फौ. चालक दामोदर सोनार यांच्या पथकाने शिताफीने तपास करुन गुन्हयातील आरोपी क्रमांक १ ते ३ यांचा शोध घेवुन त्यांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.