प्रा. दीपक बाविस्कर यांना पीएच.डी. प्रदान

0

धुळे :- येथील अभय युवा कल्याण केंद्र संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक रामदास बाविस्कर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फ पीएच डी (शिक्षणशास्त्र) प्रदान करण्यात आली. प्रा बाविस्कर यांनी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातीत बी.एङ व डी.टी.एङ ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्य समाधानाचा व स्व परिणाम कारकतेचा तुलनात्मक अभ्यास ‘ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला त्यांना प्राचार्य डॉ वाय एच सनेर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा डॉ . बाविस्कर यांनी यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयात सेट, एम.फिल. पदवी संपादन केली असून ते योग शिक्षक, समुपदेशन मार्गदर्शन पदवी प्रशिक्षीत आहेत . संस्थेच्या अध्यक्षा डॉ शालीनीताई बोरसे, डॉ सुधाकर बोरसे सचिव डॉ अभय बोरसे यांनी अभिनंदन केले. प्रा डॉ बाविस्कर सकाळचे प्रतिनिधी
असून सेवा निवृत्त मुख्याध्यापक ईश्वरलाल बिऱ्हाडे, शिरपूर यांचे भाचे तसेच सेवानिवृत्त शिक्षिका मायादेवी बाविस्कर यांचे पुत्र आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.