प्रा.डॉ. वासुदेव आर.पाटील यांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान !

0

जळगाव (प्रतिनिधी) :- गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर.पाटील यांना रोटरी जळगाव ईस्ट च्या दि.४ रोजी डॉ.जी.डी. बेंडाळे रोटरी हॉल,गणपती नगर जळगाव येथे पार पडलेल्या सोहळ्यात नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या सोहळ्या प्रसंगी रोटरी ईस्ट चे पदाधिकारी व सत्कारमूर्ती शिक्षक गण उपस्थित होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षा सेंट तेरेसा स्कूल च्या माजी व्यवस्थापन सदस्य मा.बर्वे मॅडम होत्या.तसेच ब्यासपीठावर निवृत्त शिक्षणाधिकारी निलकंठजी गायकवाड हे देखील उपस्थित होते. या सोहळ्यात प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांचा सपत्नीक त्यांच्या सत्कार करण्यात येऊन त्यांना मानपत्र देण्यात आले.सत्कारा प्रसंगी प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी गरुड महाविद्यालयाच्या कृतिशील उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा उल्लेख केला.या सोहळ्या प्रसंगी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.दिनेश पी.पाटील व आविष्कार स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी कु.मनीषा चौधरी हे उपस्थित होते.अवॉर्ड मिळाल्या प्रित्यर्थ संस्थेचे चेअरमन दादासो.संजयजी गरुड,संस्थेचे सहसचिव दिपकजी गरुड,संस्थेचे संचालक यु.यु.पाटील,भैय्यासाहेब स्नेहदीप गरुड यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.