प्रहार दिव्यांग कर्मचारी व अधिकारी शासकीय-निमशासकीय संघटनेची आढावा बैठक संपन्न

0

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्टात सक्रीय कार्य तत्परता व दिव्यांगासाठी प्रेरीत असणारी प्रहार दिव्यांग कर्मचारी व अधिकारी शासकीय-निमशासकीय संघटना मुबंई 11 यांची नुकतीच राज्य स्तरीय बैठक औरगांबाद येथे दि.07/02/2021 रोजी राज्याध्याक्ष रवींद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. आगामी काळात दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटन तसेच अनेक प्राथमिक समस्या यांचा आढावा घेवून त्यावर त्वरीत उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन राज्याधक्ष दिले.

शासकीय कार्यालयात अनेकदा दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शासननिर्णंयांची पायमल्ली होताना दिसून येते, मात्र यापूढे शासनाला सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांग व्यक्ती अधिनियम2016 मधील तरतुदी कलमानूसार न्याय मिळणे अपेक्षित आहे.

प्रहार दिव्यांग कर्मचारी व अधिकारी शासकीय-निमशासकीय संघटना मुबंई 11 संघटनेच्या राज्यासचिव पदी नुकतीच सौ.भक्ती ललीत राका,( सहायक अभियंता )महावितरण नाशिक यांची श्री रवींद्र सोनवणे राज्याध्याक्ष यांनी सर्व संघटनेच्या कार्यकारणीच्या एकमताने केली .पहील्यांदाच महिला दिव्यांग कर्मचारी सचिव म्हणून नियुक्त झालयावर सर्व स्तरावरून आंनद होत आहे. सौ.भक्ती ललीत राका यांनी अनेक दिंव्याग बांधवाची सेवा देखील त्यांनी केली आहे. सतत दिव्यांग कर्मचारी बांधावासाठी एकनिष्ठेने कार्य  निश्चित खात्रीने केली जाईल असे आश्वासन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.