प्रशासनाने नव्हे तर जनतेने सहकार्य करणे गरजेचे – साहेबराव पाटील

0

लॉक डाऊन मध्ये घरी थांबलो तर ही परिस्थिती जनता बदलू शकते – आमदार अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी):- कोरोना मोहल्ला कमिटी स्थापन करत त्यात नगरसेवक यांचा समावेश.मास्क वापरणे,वारंवार हाथ धुणे,सोशल डिस्टन्स,विनाकारण गर्दी न करणे हे महत्वाचे मुद्दे आहे. आम्ही या सर्वांमध्ये रहातो पण सर्व जवाबदारी पाळतो. पण बाजारात या नियमांचे पालन न झाल्याने कोरोना वाढला. लॉकडाऊन उधडल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे.

यामुळे या कमिटीने त्या भागातील नागरिकांना समजावून सांगायचे आहे. वेळ प्रसंगी दंड पण आकारायचा आहे.वयोवृद्धांची जास्त काळजी घ्यायची आहे.त्यांची वेळेत तपासणी झाली तर भविष्यातील अनेक धोके टळू शकतात.कोरोना मुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते या बाबी टाळाव्यात.काढा घ्या,रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे औषध,गोळ्या घ्या असे प्रास्ताविकात तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मांडले.तर पो नि अंबादास मोरे यांनीही मोहल्ला कमिटी,शांतता कमिटी सदस्य यांनी सक्रिय सहभागाने हे काम करायचे आहे.यातून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावे हे देखील कार्य करायचे आहे.उपद्रवी लोकांचीही यादी बनवायची आहे.त्याच्या कडून कायद्याचे कशे पालन करवून घेऊ,बाजारात विना कारण फिरणे टाळा,स्वतःच्या मनाला आवर घाला यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनीही सांगितले की आपल्या कडे कोरोनाला शून्य केले होते. पण अनलॉक झाल्याने रुग्णांची संख्या वाढली.ही साखळी गेल्या सात दिवसात आपण थांबविण्यात यशस्वी झालो तरच आपण अमळनेर गावास न्याय देऊ शकू.विनाकारण फिरणारे लोक कोरोना घरी घेऊन जातात हे लक्षात घ्या.बाजारात बेजबाबदार पणे वागू नका.मोकळं सोडल्याचा दुष्परिणाम रुग्णसंख्या 400 वर गेली.अनेक गोष्टींवर आडा घातला आहे पण जनता ऐकत नाही.29 गोष्टीचे पालन करायला सांगितले पण 8 गोष्टी पाळल्या जातंय तर 21 गोष्टींचे उल्लंघन करताय.आम्ही सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन आवाहन केले त्याचेही कोणी ऐकत नसेल तर चुकीचं आहे.वयोवृद्ध मंडळी पण विनाकारण गावात फिरतांना दिसते.प्रत्येकाने घरात आपापल्या स्वकीयांची काळजी घ्या असे मत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी ऍड शकील काझी यांनीही सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले, स्वप्नातही विचार न केलेला आजार कोरोना आहे.समाजात वावरत असलेल्या अनेकांना कोरोना झालाही असेल आणि तो गेलाही असेल.कोरोनात आता आपला विचार करणे गरजेचे आहे. आज जर लॉक डाऊन मध्ये घरी थांबलो तर ही परिस्थिती बदलून आपण कोरोनाला पळवू शकतो.या सर्वांना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येणे गरजेचे आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रुप बनवून नागरिकांना सूचना देऊ शकतात.यामागील श्रेय हे फक्त तुमचेच असेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन पो.उ.नि.शरद पाटील यांनी तर आभार प्रशासन अधिकारी संजय चौधरींनी मानले. कार्यक्रमास न.पा.चे विरोधी पक्षनेते प्रवीण पाठक मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिंगबर महाले, ऍड शकील काझी,नगरसेवक संतोष पाटील, निशांत अग्रवाल, शेखा मीस्तरी, सुरेश पाटील यांच्या सह महेश पाटील,राजेंद्र यादव,विक्रांत पाटील, माधुरी पाटील, प्रमोदींनी पाटील, जयश्री साळुंखे, सुलोचना वाघ उपस्थित होते.शांतता कमिटी,महिला दक्षता समिती, मोहल्ला कमिटी सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.