प्रवाशांना दिलासा ; पुणे – दानापूर/भागलपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या

0

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्यरेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी संपूर्ण आरक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिल्यानुसार :

1.  पुणे-दानापूर विशेष अतिजलद 

01471 विशेष पुणे येथून दि. २७.४.२०२१ रोजी १७.४० ​​वाजता सुटेल व दानापूर येथे तिसर्‍या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल.

01472 विशेष दानापूर येथून दि. २९.४.२०२१ रोजी ०५.०० वाजता  सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी  ११.३५ वाजता पोहोचेल.

थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.  दीन दयाल उपाध्याय जं.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी.

2. पुणे-भागलपूर विशेष 

01469 विशेष पुणे येथून दि. २८.४.२०२१ रोजी ०६.१० वाजता सुटेल आणि भागलपूर येथे दुसर्‍या दिवशी १८.४० वाजता पोहोचेल.

01470 विशेष भागलपूर येथून दि.  २९.४.२०२१ रोजी २२.०० वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्‍या दिवशी  ११.३५ वाजता पोहोचेल.

थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.  दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल, जमालपूर.

संरचना : ७ शयनयान, ११ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षणः  पूर्णतः आरक्षित 01471 आणि 01469 या  विशेष गाडयांचे विशेष शुल्कासह बुकिंग 25.4.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या  विशेष गाडयांच्या थांब्यांच्या तपशीलासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.