पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शन महागात पडले; महंतांसह 19 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत राठोड यांना पाठिंबा दिला होता. पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. राज्यात करोनाचे संकट असताना इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र आल्यामुळं करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता ती शक्यता खरी ठरत असल्याचं चित्र आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना करोनाची बाधा झाली आहे.

 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण प्रशासन करोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना अशी गर्दी जमवल्यामुळं राठोड यांच्यावर चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत आहे. असं असतानाचा आता पोहरादेवी येथील गर्दीमुळं करोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

वाचाः संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेची महाआघाडीतच कोंडी

 

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना करोनाची लागण झाली आहे. कबिरदास यांच्या कुटुंबातील अन्य तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. तर, काही जणांना करोनाची लक्षण जाणवत आहेत. एबीपीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.