पोलिसांची कार्यतत्पर्ता ; विद्यार्थ्याची हरवलेली फाईल केली परत

0

भुसावळ (प्रतिनिधी) : अमरावती येथील विद्यार्ध्याची हरवलेली  शैक्षणिक कागदपत्रे असलेली  फाईल येथील शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यास दिल्याने या विद्यार्थ्याने पोलिसांचे आभार मानले आहे.

शहर पोलिसात अंकित राजू पांडे (अचलपूर, अमरावती) या रेल्वेत अँप्रेटीस करणार्या तरुणाने 8 नोव्हेंबर रोजी शैक्षणिक कागदपत्रे असलेली  फाईल हरवल्याची तक्रार नोंदवली होती मात्र कागदपत्रे सापडत नव्हती. दरम्यान रविवारी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंटी सैंदाणे, बडगुजर, मोहन पाटील, तांगडे व साळुंखे हे शहर पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना समता नगर परीसरात सोमनाथ मंदिरा समोरील ही फाईल बेवारसरीत्या  आढळली म्हणून पोलिसांनी  तपासणीकेली   त्यात कागदपत्रे आढळली.त्यावरून  अंकित पांडे यांचा संपर्क क्रमांक मिळाल्यावरुन  त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना फाईल परत केली यामुळे विद्यार्थ्याचे होणारे नुकसान टळले व पोलिसांनी कार्यतत्पर्ता दाखवल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.