पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील विदगावच्या दोघांना रुग्णालयात हलवले

0

अमळनेर : तालुक्यातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात असलेल्या विदगाव येथील चौघांना जळगाव येथील कोरोना रुग्णालयात सकाळी ११. ३० वाजता हलवण्यात आले. गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण हे सरपंचाचा घराजवळ असल्याचे समजते.

अमळनेर तालुक्यातील एक महिला ही पॉझिटिव्ह असल्याने तिच्या संपर्कातील नातेवाईक हे विदगाव येथील असल्याचे लक्षात आले असता गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधून त्या दोघांना रुग्णालयात हलवले.  गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुकशुकाट पसरला असून जळगाव चोपडा रस्त्यावर काटेरी झाडे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.