पुलवामा हल्ल्याचा अखेर बदला घेतला

0

‘जैश’च्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर – पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंट आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझीला जवानांनी कंठस्नान घातले आहे. मात्र भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या या वृत्तास दुजोरा देण्यात आलेला नाही. ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन कमांडर्ससहीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
पुलवामा येथील पिंगलान येथे आज पहाटपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकांनी उडवल्याचे समजते. या घरात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे समजते.
मृत दहशतवाद्यांमध्ये जैश- ए- मोहम्मदचा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचे समजते. कामरान हा पाकिस्तानचा नागरिक असून तो जैशचा कमांडर होता. या हल्ल्यात मृत्यू झालेला दुसरा दहशतवादी हा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरामाइंड अब्दुल गाझी असल्याचे समजते. गाझी हा मसूद अझहरचा निकटवर्तीय आहे. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप सुरक्षा दलांनी दुजोरा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.