पुढील आदेशापर्यंत बाजार समितीने कोणतीही सभा घेउ नये

0

खामगांव (प्रतिनिधी) :-  आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या खामगांव कृ.उ.बा.स.मध्ये अनेक बेकायदेशीर व नियमबाहय कामांची मालीका सुरु आहे. बाजार समितीचा कार्यकाळ 23 जुलै रोजी संपणार असल्याने बाजार समितीचे सभापती व सचिव हे सर्व नियम धाब्यावर बसवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहे. सभापती संतोष टाले यांनी दि.13 जुलै रोजी बाजार समितीची बेकायदेशीर सभा काढली होती.

या सभेच्या विषय सुचीमध्ये बाजार समितीच्या संचालक मंडळाने सभेमध्ये बाजार समितीच्या खर्चास कुठलीही कायदेशीर मान्यता दिलेली नसतांना 13 जुलैच्या सभेमध्ये दि.1 जानेवारी ते 30 जून पर्यंत झालेल्या बाजार समितीच्या विविध खर्चास मान्यता देणेबाबतचा विषय बेकायदेशीररित्या घेण्यात आला तसेच बाजार समितीच्या आवारातील असलेल्या दुकाने,प्लाॅट भाडेपटट्याने देणेकरीता,बाजार समितीच्या आवारातील खामगांव अर्बन को.आॅप.बॅंकेला लागुन असलेल्या पाडलेल्या दुकानांच्या जागेवर नवीन प्लाॅटची मोजणी करुन आखणी करुन ते परवानाधारकांना देणे, बाजार समितीने बाजार आवारातील तातडीच्या परिस्थितीत आवश्यक बाबींवर केलेल्या खर्चास मान्यता देणेबाबत बाजार आवारात समितीचा परवाना नसलेल्यांच्या ताब्यात असलेले गाळे,ओपन प्लाॅट ताब्यात घेणे व परवाना धारकांना आवंटीत करणे, कुठलाही ठराव झालेला नसतांना बाजार समितीच्या मालकीची ओपन प्लाॅट, दुकाने भाडेपटट्याने देणे, यासारखे अनेक बेकायदेशीर विषय कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता ठेवण्यात आले होते.

यासह अनेक गंभीर मुद्यांवर संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी आपला आक्षेप नोंदवत 13 जुलैची सभा रदद् करण्याची मागणी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,अमरावती यांच्याकडे केली होती.  त्यावर  दि.13/07/2020 रोजी आयोजित केलेल्या सभेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा लेखी आदेश 08 जुलै 2020 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,अमरावती यांनी दिला होता.

 

या आदेशाविरुध्द सभापती संतोष टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. संतोष टाले यांच्या याचीकेवर 16 जुलै रोजी सुनावणी होउन पुढील आदेशापर्यंत बाजार समितीने कोणतीही सभा घेउ नये असे आदेश न्यायमुर्ती पितळे यांनी दिले आहे. या निर्णयामुळे न्यायालयाने सभापती संतोष टाले यांच्या बेकायदेशीर कामाला दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात श्रीकृष्ण टिकार यांच्या बाजुने अॅड.उज्वल देशपांडे तर कृ.उ.बा.स.च्या वतीने अॅड.घारे यांनी काम पाहिले.न्यायालयाच्या या निर्णयामुळे सभापती यांच्या बेकायदेशीर कामाला चपराक बसली असुन  आमीषेपोटी अडते व व्यापारी यांची  फसवणुक होउ शकते.म्हणून त्यांनी सभापती व सचिव यांच्या आमिषाला बळी पडु नये असे आवाहन बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.