पारोळा येथे शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस साजरा

0

पारोळा (प्रतिनिधी) : (स्व) बाळासाहेब ठाकरे, प्र के अत्रे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज त्या स्थापनेला ५५ वर्ष होत असून शिवसेना पक्ष एक चैतन्य निर्माण करणारा पक्ष असून गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे .उभा राहील यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकुन एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केेले.ते पारोळा

कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त  बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील ,संचालक चतुर पाटील ,उपसभापती दगडू पाटील, माजी जि प सदस्य डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे चेअरमन अरुण पाटील, व्हा चेअरमन भिकन महाजन, इंधवेचे सरपंच जितेंद्र पाटील,दळवेलचे सरपंच रोहिदास पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे ,तालुकाप्रमुख प्रा. आर बी पाटील, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद पाटील, टिटवी चे समाधान मगर ,शेतकी संघ संचालक चेतन पाटील, बहादरपुर चे माजी सरपंच गोकुळ चौधरी, पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव कृउ.बा. संचालक प्रा. पी एन पाटील,  मधुकर पाटील,प्रकाश वाणी, प्रेमानंद पाटील, राजू कासार, भुषण भोई, प्रशांत पाटील यांच्यासह शिवसेना ,युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेना स्थापनेबाबत माहिती देत शिवसेनेने त्याकाळी “बजाव पुंगी हटाव लुंगी “आंदोलन केले होते .आज मराठी माणसाला बळकटी देण्याचे काम शिवसेना करीत  आहे. म्हणून शिवसेना पक्षात कार्यकर्त्याला मोठे स्थान  आहे .येणाऱ्या काळात होवु घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एका दिलाने  कामाला लागावे असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, इंधवेचे सरपंच जितेंद्र पाटील शेतकी संघाचे चेअरमन अरुण पाटील, कृउबास संचालक चतुर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक, आर,बी, पाटील यांनी मानले.तर यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते तसेच शिवसैनिक उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.