पारोळा येथील ऐतिहासिक वारसा असलेला वहनोत्सव रथोत्सव यंदा रद्द

0

पारोळा (प्रतिनिधी) : ज्या दिवसाची संपुर्ण वर्षभर श्र्दाळु  वाट पाहातात तो दिवस म्हणजेच पारोळा शहरातील ब्रम्हमोत्सव रथोत्सव यावर्षी हा ब्रम्होत्सव कोरोना मुळे स्थगित करण्यात आल्याने अनेकाच्या आनंदावर विरंजन पडले आहे,या बाबत अधिक असे कि

येथिल ऐतिहासिक वारसा असलेल्या वहानोत्सव तसेच ३८० वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सव यंदा इतिहासात प्रथम वेळेस कोरोना  महामारी च्या पार्श्वभुमिवर स्थगित करावी लागल्या ची घटना  घडल्याची माहिती विश्वस्ता कडुन देण्यात आली,या वर्षी कोरोना मुळे संपुर्ण जगात जे कधीच घडले नाही ते या वर्षी घडत आहे,येथिल यात्रोउत्सव हा अश्विन शु प्रतिपदे पासुन प्रारंभ होत असतो तर विजया दशमी च्या दुसर्या दिवशी एकादशीच्या दिवशी पारोळा तालुक्याचे वैभव असलेला रथोत्सव हा साजरा केला जातो, हा रथ संपुर्ण महाराष्ट्रात मोठा असल्याची ख्याती आहे, या दिवशी देशाच्या कानाकोपर्यातुन भक्त येऊन श्री चे दर्शन घेऊन तृप्त होत असतात तसेच यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसा पासुन श्रीची मृर्ती वहनात सजवुन( लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय) नाम घोषात संपुर्ण शहरात मिरवली जाते ते दृष्य ही दररोज पाहाण्या सारखे असते या यात्रोत्सवा निमित्त अनेक लहान मोठे व्यापारी बाहेरून येऊन आप आपली दुकाने लावतात तर कोरोना मुळे या लहान लहान व्यसायिंकावर सुध्दा या वर्षी उपासमारीची वेळ येणार आहे,या यात्रो उत्सवहा  दरम्यान जवळ पास २ ते कोटी ३ रूपयाची उलाढाल होत असल्याची माहिती मिळाली  ज्या मुळे तालुक्यातील आर्थिक स्थिती सुधारते या वर्षी आगोदरच कोरोना मुळे बाजार पेठ तीन ते साडेतीन महिने बंद होती त्यातच या वर्षी यात्रोत्सव रद्द झाल्याने व्यापार्याना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे,यावर्षी चे सर्व कार्यक्रम साद्या पद्दतीने फक्त मंदिर परिसरात घरगुती वातावरणात विश्वस्त व स्वंयसेवकांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती विश्वस्ता मार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आली,तसेच दरवर्षी श्रींचा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात होत असतो ज्यात हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात ते ही होणार न असल्याची माहिती देण्यात आली या ऐवजी संपुर्ण शहरात घराघरात श्रींचा प्रसाद म्हणुन लाडु चे वाटप स्वंयसेवका मार्फत घरोघरी या प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महाप्रसाद समिती अध्यक्ष मा,खा, ए,टी,पाटील यांनी दिली,या पत्रकार परिषदेस संस्थान अध्यक्ष श्रीकांत शिंपी,महाप्रसाद समिती अधक्ष ए,टी,पाटील,कार्यध्यक्ष रावसाहेब भोसले,विश्वस्त केशव क्षत्रिय,अरूण वाणी,संजय कासार,दिनेश गुजराथी,प्रकाश शिंपी,डा,अनिल गुजराथी,यांच्या सह स्वंयसेवक उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.