पारोळा-बहादारपूर रस्त्यावर आयसर उलटला ; १ ठार १८ गंभीर

0

पारोळा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील बहादारपूर-मोंढाळे रस्त्यावर दि १६ रोजी सायंकाळी ५ वाजता धुळे येथील एकूण ३५ नागरिक असलेल्या आयसर ने परतीच्या मार्गावर असताना मोंढाळे गावाजवळील वळणावर वेग कंट्रोल न झाल्याने तो उलटून यात एक ठार तर ४ अति गंभीर तर १८ जखमी व इतर १३ जण किरकोळ जखमी झालेत.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार धुळे येथील ट्रक क्रमांक एम.एच. १८ ५५३५ हि एकूण ४० ते ४२ नागरिकांना घेवून ज्यात पुरुष, महिला व बालके होती ते पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथे वीरांच्या कार्यक्रमासाठी आली होती सदर कार्यक्रम आटोपून सदर ट्रक हा परतीच्या मार्गावर असताना ठीक ५ वाजता मोंढाळे गाव एक किमी मागे असलेल्या वळणावर ट्रकचा वेग कंट्रोल न झाल्याने तो भरधाव वेगात उलटला त्या मुळे तर्क मधील चिंधा बाबुराव रणदिवे ५० रा धुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर राज अनिल माळी १२ धुळे, पुना संभाजी माळी १३ धुळे,अंशुमन सुदाम महाजन ९ सुरत, हिराबाई देविदास माळी ४० धुळे, शुभम राजेंद्र परदेशी १६ धुळे वसंत बाबुराव खैरनार ५२ धुळे, मीना वसंत खैरनार ४२ धुळे ,रवींद्र शाळीग्राम पाटील,५५ धुळे,सुकलाल शंकर महाजन ६० धुळे, सुदाम बाबूलाल सोनवणे ३२ सुरत , देविदास दामू बद्गुजर७० धुळे, पंडित शंकर माळी ७२ जातीम प्रकाश माळी १४ सेंधवा गुलाब महाजन ६० मंदाणे, वैशाली प्रदीप महाजन ३२ सेंधवा, शीतल कैलास माळी २८ सुरत विनिता प्रदीप महाजन १० कुणाल प्रदीप महाजन ९ यांना डोक्यास जबर मार लागल्याने त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयातून धुळे येथे हलविण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.