पाण्यावरून राजकारण करू नका अन्यथा रस्त्यावर उतरू- मा.नगर अध्यक्ष गोविंद शिरोळे

0

शविआ च्या नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना पाणी नियोजन साठी निवेदन

पारोळा – तामसवाडी धरणात पारोळा शहरवासियांना जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा आरक्षित आहे. पण तांत्रिक अडचणी मुळे नगरपालिका प्रशासनाकडुन पाण्याचे नियोजन कोलमडल्या मुळे शहरवासियांना पंधरा ते अठरा दिवसा नंतर पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे .आणि यातच काही सत्ताधारी नगरसेवकांच्या भागांत दोन दोन दा पाणी आवर्तन सोडले जात आहे, असा आरोप शविआ च्या नगरसेवकांनी केला पाण्यात राजकारण करु नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांना शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दिला.

या वेळी मुख्याधिकारी माने यांनी धरणावर व्हाल मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता नगरपालिका प्रशासनाने पदाधिकारी यांच्या मदतीने युद्धपातळीवर काम करीत दुरुस्ती केली आहे .रोटेशन पद्धतीने शहराला सर्वत्र ठरल्याप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल यात कोणतेही राजकारण होणार नाही सर्व २३ नगरसेवक प्रशासनाला सारखे आहेत असे सांगितले. शहराला गेल्या पंधरा ते अठरा दिवसा पासुन नगरपालिकाद्वारे पाणी पुरवठा न झाल्याने नागरीक विशेषता महिला हंडा घेऊन पाण्या साठी भटकंती करीत आहे . सत्ताधारी नगरसेवकांच्या वार्डात टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला .पाण्याचे नियोजन करा प्रत्येक भागात ठरलेल्या रोटेशन पद्धतीने पाणी सोडा असे सांगितले . शहर विकास आघाडीचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या साठी कार्यकर्त्या च्या मदतीने गावात घरोघरी जाऊन मोफत जार ने पाणी वाटप केले तांत्रिक बिघाड निघाला आहे

रोटेशन चे नियोजन झाले पाहिजे, पाणी सोडण्या बाबत सर्वांना समान न्याय द्या असे आशय चे निवेदन मुख्याधिकारी डॉ सचिन माने याना विकास आघाडीचे प्रमुख गोविंद शिरोळे यांच्या सह नगरसेवक रोहन मोरे नितिन सोनार, मनोज जगदाळे, महेश चौधरी अशोक चौधरी आदी जण उपस्थित होते निवेदन दिले त्या वर नगरसेविका सौ वंदना शिरोळे, नगरसेवक नितिन सोनार, रोहन मोरे, पल्लवी जगदाळे, अशोक चौधरी, मिनल पाटील, महेश चौधरी यांच्या सहया आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.