पाणी पुरवठा योजनेचे कार्यदेश देण्याची भाजपाची मागणी

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहरासाठी युती सरकारच्या कार्यकाळात नवीन २५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली होती मात्र योजनेवर स्थगिती देण्यात होती व ती स्थगिती उठल्यानतंर आता या योजनेचे कार्यदेश देण्याची मागणी भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली

युती सरकारच्या कार्यकाळात ततकालीन मुख्यमंत्री देवैद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी शहरासाठी नवीन २४ / ७ ची २५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर केली होती याच दरम्यान महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते व सर्वच कामाला स्थगिती देण्यात आली होती मात्र दि ६ जानेवारी रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत या योजनेवरील बंदी उठविण्यात आल्याने या योजनेचे कार्यदेश देऊन  लवकरात लवकर  सुरु करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे , शे अखलाक शे युसुफ , अल्लाद्धीन शेठ , सुनिल माळी , शामराव धनगर , ए जी जंजाळे , ज्ञानेश्वर घाटोळे ,मिलीद भैसे , कृष्णा माळी ,भाऊलाल टिटोरे , संदिप माळी आदींनी मुख्यधिकारी श्याम गोसावी यांना निवेदन देऊन मागणी केली

Leave A Reply

Your email address will not be published.