पाचोऱ्यात भाजपाचा महाएल्गार मोर्चा

0

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महायुतीतर्फे आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने दूध उत्पादकांसह राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अशा विविध समस्यांबाबत शेतकरी अडचणीत सापडला आहे. ह्या झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व रिपाई आठवले गट), रा.स.प., रयत क्रांती संघटना, व शिवसंग्राम महायुती तर्फे राज्यव्यापी *महाएल्गार आंदोलन* दि. १ आॅगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता येथील जारगाव चौफलीवर करण्यात आले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, सदाशिव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, शहर अध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, बाजार समितीचे सभापती सतिष शिंदे, जि. प. सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड, माजी सभापती बन्सीलाल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील जारगांव चौफुलीवर दि. १ आॅगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता महाविकास आघाडीतर्फे “महाएल्गार आंदोलन” करुन सुमारे अर्धा तास रास्तारोको करण्यात आला. गायीच्या दुधाला सरसकट १० रुपये प्रती लिटर व दुध पावडरला ५० रुपये प्रति किलो अनुदान मिळावे, दुध खरेदीचा दर १० रुपये प्रति लिटर करण्यात यावा, शेतकऱ्यांचा मागील वर्षाचा घरात पडुन असलेला कापुस, मका व ज्वारी लवकरात लवकर हमी भावाने पुर्णपणे खरेदी करुन दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना युरीयासह तत्सम रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांचे ताळेबंद मधील तीन महिन्यांचे विज बिल सरसकट माफ करावे. यासारख्या विविध मागण्यांसाठी महाएल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महाविकास आघाडी विरोधारात घोषणा बाजी करत सुमारे अर्धा ते पावुन तास रास्तारोको करण्यात आला. आंदोलन करते वेळी दुधाचे पाकीट हातात घेवुन घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष शाहीद शब्बीर शेख, नगरसेवक विष्णु अहिरे, गोविंद शेलार, युवा मोर्चा अध्यक्ष समाधान मुळे, तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, राजेश संचेती, मंगेश महाले, कुमार खेडकर, योगेश ठाकुर, स्वप्निल सोनार, अविनाशी कोठावदे, विरेंद्र चौधरी, आकाश ठाकरे, शैलेश जाधव, अमोल खैरनार, किशोर संचेती, सनी जगताप, मुकेश पाटील (आंबे वडगाव), योगेश चौधरी (वरखेडी), अनिल पाटील (गाळण), रविंद्र पाटील (सामनेर), विजय पाटील (सारोळा), दिपक सामदानी (पाचोरा), प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व तहसिलदार कैलास चावडे यांना विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.