पाचोऱ्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई 

0

पाचोरा (प्रतिनिधी) : सार्वजनीक आरोग्‍य विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना /२०२०/प्र. क्र. ५८/ आरोग्‍य – ५ दि. १४ मार्च २०२० नूसार जिल्‍हयात कोविड – १९ चा संसर्ग रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ आणि आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ लागू करण्‍यात आलेला आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतलेल्‍या व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींग मध्‍ये दिलेल्‍या आदेशानूसार तसेच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्‍या दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा शहरात वेळोवेळी अनाऊन्‍सींगद्वारे, जाहिर सुचनेद्वारे तसेच नगरपरिषदेच्‍या अधिकारी / कर्मचारी यांनी शहरात सुचना देऊन देखील चेहऱ्यावर मास्‍क न लावणे, सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, गर्दी टाळणे, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे व इतर तरतूदींचा भंग केल्‍या प्रकरणी दि. ११ रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरत नगरपरिषद कर्मचा-यांसह धडक दंडात्‍मक कार्यवाही करत २६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्‍यात आला. तसेच शहरातील काही दुकानांवर मास्‍क न लावणे व सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे या पोटी ६ दुकानदारांवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, १८९७ चे उल्‍लंघन म्‍हणून भा. द. वि. कलम १८८ नूसार गुन्‍हा दाखल करण्‍याची कार्यवाही सुरु आहे.

सदर धडक मोहीमेचे नेतृत्‍व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले पथकामध्‍ये प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सुर्यवंशी, साईदास जाधव, शाम ढवळे, विजेंद्र निकम, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, गजानन पाटील, आकाश खैरनार, किशोर मराठे, भिकन गायकवाड, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, गोविंद पारोचे, आकाश खेडकर, संजय जगताप, सचिन कंडारे, सरजु बाबु डागोर, किरण ब्राम्‍हणे, भास्‍कर पवार, अनिल बागुल संजय वाकडे, सुभाष बागुल, युसुफ पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यास नगरपरिषदेकडून मोहीम अधिक तीव्र करण्‍यात येईल व यापुढे देखील अशीच धडक दंडात्‍मक कारवाही करण्‍यात येईल असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.