पाचोऱ्यातील बुरहानी स्कुलमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0

पाचोरा – येथील बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या एकुण १०८ विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी हातीमभाई बोहरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा विभागाचे पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकडे उपस्थित होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मेहनत, चिकाटी व परिश्रम यातुन नक्कीच यश मिळते. तसेच मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टी करिता करावा. माझ्या सारखा अधिकारी बना. व शाळा, गांव, देश यांचा अभिमान बाळगा. कार्यक्रमात संस्था पदाधिकारी एम. वाय. बोहरी, टी. एम. कपासी, मुस्तफाभाई लकडावाला, मुस्तफाभाई भडगांव वाला,ई. एम. बदामी, ए. एफ. कपासी, बी. एन. पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पेन भेट देण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणुन प्रत्येक वर्गातुन एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांची निवड करुन त्यांना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. सोमपुरकर मॅडम यांनी तर देवल जोशी यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.