पदवी सिद्ध करण्यासाठी काम करावे लागेल – प्राचार्य अरविद चौधरी

0

बोदवड – पदवी प्राप्त करणे सोपे आहे परंतु सिद्ध करण्यासाठी अनुरूप काम दाखवावे लागेल व कामात सातत्य ठेवावे लागेल, काम असे करा ज्यातून तुमची पदवी तेजस्वी होईल व पदवीधर यशस्वी होईल असे प्रतिपादन बोदवड महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सेठ जी.बी. मुरारका कला व महाविद्यालय शेगाव येथे आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.

दि १३ फेब्रुवारी २०२० रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सेठ जी.बी. मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ वर्षात कला व वाणिज्य विद्याशाखेच्या पदवी प्राप्त स्नातकासाठी पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी संस्था प्रमुख श्री संजयकुमार मुरारका, प्राचार्य अनिलकुमार राठोड, कला विभागाचे विभागप्रमुख डॉ. देठेकर वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ.मेश्राम व्यासपीठावर उपस्थित होते.

सोहळ्याची सुरवात विद्यापीठ गीताने झाली कला व वाणिज्य विभाग प्रमुखांनी विद्याशाखानिहाय पदवीप्रदान करण्यासाठी विद्यापीठ कार्यपद्धतीनुसार सोहळ्यात उपस्थित स्नातकाना पदवी प्रदान करण्याबाबत निवेदन केले.

कला विद्याशाखेच्या सुमारे ९६ व वाणिज्य विद्याशाखेच्य ७८ पदवी प्राप्त स्नातकाना या सोहळ्यात प्रमुख अतिथी प्राचार्य अरविंद चौधरी,श्री मुरारका याचे हस्ते पदवी वितरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.