पाचोरा येथे शासकीय ज्वारी, मका खरेदी केंद्राचा दिलीप वाघ यांच्या हस्ते शुभारंभ

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  येथील शेतकरी सहकारी संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका खरेदी करण्याची सुरुवात मा. आ. दिलीप वाघ यांचेहस्ते ३० मे रोजी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील, शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील व तहसिलदार कैलास जावडे उपस्थित होते. शेतकरी शोभा भिला पाटील यांच्या मका पिकाचे खरेदीने खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या माल व्यापाऱ्यांनी विकु नये तर शेतकऱ्यांचा माल तपासून घेण्याचे प्रशासनाला सूचित केले. कोणत्याही व्यापार्‍याने शेतकऱ्यांचा घेतलेला माल विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाईचे संकेत तहसिलदार कैलास चावडे यांना यावेळी दिले. याप्रसंगी प्रशांत पवार व व्यवस्थापन शेतकी संघ प्रभाकर भावसार, संचालक प्रकाश निंकुभ, दिनेश पाटील उपस्थित होते.

“हरभरा खरेदी वगळता मक्का व ज्वारी शासकीय खरेदी ची नोंदणी सुरु आहे परंतु प्रत्यक्षात खरेदी सुरू नव्हती हीच मागणी मी काही दिवसांपूर्वी शासनास व प्रशासनास लक्षात आणून दिली. त्याची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून झाली त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. असेही मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.