वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशवतवादावर आपली कबुली दिली आहे. पाकिस्तानमध्ये 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय होते, असे खान यांनी म्हटले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या शीला जॅक्सन ली कॅपिटोल हिल येथे आयोजित केलेल्या समारंभात इम्रान खान बोलत होते.
पाकिस्तानातील सरकारांनी खासकरुन मागच्या १५ वर्षात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितले नाही. आम्ही दहशतवादाविरोधात लढाई लढत असल्याचे अधोरेखित करतानाच, पाकिस्तानचा ९/११ च्या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही, असेही खान यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानात ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. पाकिस्तानसाठी तो असा काळ होता जेव्हा आमच्यासारख्या लोकांना आम्ही यातून वाचू का? ही भिती आमच्या मनामध्ये होती. दहशतवादाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही आणखी काहीतरी करावे अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा त्यावेळी स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु होता असे इम्रान यांनी सांगितले.