पहूर येथील पुन्हा दोन जणांचे तपासणी अहवाल पॉझीटीव्ह

0

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : पहूर पेठ येथे 42 वर्षीय शिक्षकांसह 17 वर्षीय तरुणीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली.

पहूर पेठ येथील संतोषीमातानगरात राहणाऱ्या 42 वर्षीय शिक्षकाला तसेच ख्वाजा नगरातील त्या बाधिताच्या कुटुंबातील 17 वर्षीय तरुणीचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील व कुटूंबातील लोकांचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. रहिवास असलेला परिसर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधित करण्यात आला असून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.