परीट समाजाचा आदर्श विवाह : मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातच विवाह

0

आर्थिक खर्चासह रूढी परंपरांना फाटा

भुसावळ :- जुनाट रूढी व परंपरा यासह खर्चिक बाबींना फाटा देत पसंतीच्या कार्यक्रमातच वधू व वरांकडील मंडळींनी अत्यंत अचूक निर्णय घेऊन समाजापुढे नवा व उत्तम असा आदर्श येथील परीट समाजातील वाघ आणि मोकलकर   या कुटुंबियांनी आपल्या मुलीचा व मुलाचा विवाह करून  समाजापुढे ठेवली . या कौतुकास्पद व समाजहिताच्या निर्णयाचे स्वागत समाजबांधवांनी केले आहे .

येथील परीट  समाजातील दत्तू वाघ हे त्यांच्या मुलाकरिता अकोला येथील अशोक विश्वनाथ मोकलकर यांची मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाकरिता समाजातील व नातेसंबंधातील आप्तइष्ठ मंडळींना घेऊन सस्ती येथे गेले होते . मुलाने मुलींला व मुलीने मुलाला बघितले पसंती झाली . आणि पुढील बोलणी सुरु झाली . आजच्या धकाधकीच्या व दुष्काळजन्य पररिस्थिती मध्ये वारंवार गावांना ये जा होऊ शकत नाही . प्रत्येका करिता हा विषय अत्यंत त्रासदायक व खर्चिक ठरतो.

सध्या विवाह म्हटला की किमान पाच दिवस चालना-या परंपरा डोळ्यासमोर येतात . त्यात पसंती , साखरपुडा , संगीत , मेहंदी , लग्न , यासह वधू  व वरांकडील मंडळींचा व-हाडयांचा मानपान करण्यात मोठ्या प्रमाणात वेळे बरोबरोबरच पैश्याची नासाडी होत असते.हा मानपान सांभाळताना अनेकदा नाहक वादविवाद होऊन विषय विकोपालाही जातात आणि म्हणून .हे सर्व टाळण्याकरिता नांद्रा ता. जळगाव येतथील दत्तू शंकर वाघ यांचे चिरंजीव गजानन वाघ आणि सस्ती, ता. पातूर, जिल्हा अकोला येथील अशोक विश्वनाथ मोकलकर यांची कन्या प्रियंका यांचा विवाह नुकताच या सर्व प्रकारांना फाटा देऊन आदर्श  विवाह झाला. खरं तर मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी मुलाकडील मंडळी सस्ती येथे गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा करून लागलीच विवाह करण्याचा निर्णय घेतला. व केवळ वरमाला ( हार)  टाकून हा विवाह पार पडला. या विवाहाप्रसंगी गजानन दत्तू वाघ, दत्तू शंकर वाघ, अरुण मुकुंदा राऊत, ईश्वर रमेश जाधव, योगेश ईश्वर जाधव आदींसह दोन्ही कुटुंबातील मोजकी मंडळी उपस्थित होती. या आदर्श विवाहाचे परीट समाजातून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.