पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघात ज्येष्ठ पत्रकारांचा गुणगौरव समारंभ

0

जळगांव दि. 3 –
पत्रकार संघात शनिवार 6 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा व छायाचित्र प्रदर्शन,ज्येष्ठ पत्रकारांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी महनिय वक्ते म्हणून माजी स्विकृत समिती माजी अध्यक्ष यदु जोशी,दै.नवशक्तीचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सुकृत खांडेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वस्थ अध्यक्ष मंडळ जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष विजयबापू पाटील भूषविणार असून प्रमुखपाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,आ. राजूमामा भोळे, आ.स्मिताताई वाघ, आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर सीमाताई भोळे, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी,माजी आ. सुरेशदादा जैन, उद्योजक अशोकभाऊ जैन, माजी आ.(पाचोरा) आर.ओ.तात्या पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडखे,माजी आ.(एरंडोल) महेंद्रसिंग पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांनी, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया प्रतिनिधी, छायाचित्रकार, ज्येष्ठ पत्रकार यांनी उपस्थित रहावे,पत्रकार दिन कार्यक्रम वर नमूद केलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता साजरा होणार असल्याचे पत्रकार संघ सरचिटनिस रितेश भाटिया यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.