निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील वैभव पाटील बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरावर

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  नुकत्याच नाशिक येथील विभागीय क्रिडा संकुलन अहिरवाडी येथे संपन्न झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षाआतील वयोगटात निर्मल इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी वैभव रामदास पाटील इयत्ता सातवी याने अतिशय चमकदार कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.

दि 17 ते 19 ऑक्टोंबर 2019 या दरम्यान हाळदा, खापोली, जिल्हा रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल वैभव याचे संस्थेचे अध्यक्ष वैशाली सूर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य प्रदीप सोनवणे, गणेश राजपूत व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील तसेच शाळेतील क्रीडा शिक्षक गणेश मोरे, नंदकिशोर पाटील, सुशांत जाधव, दिलीप चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.