निपाणे येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ७ – ३० वाजता बौद्ध वाड्यात साजरा करण्यात आला यावेळी मनोज भागवत हटकर यांच्या हस्ते वाड्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानिक पुतळ्याचे पूजन माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील भागवत हटकर सागर पाटील माजी सरपंच एल के जाधव समता दुत शांताराम हटकर रमेश जाधव मुकूंद सोनवणे मनोज जाधव  रामदास जाधव सुभाष जाधव भिवसन जाधव मच्छिंद्र निकम आनंदा अहिरे सुपडू निकम पिंटू निकम नवल सोनवणे आदी ग्रामस्त उपस्थित होते यावेळी समता दुत शांताराम हटकर व मनोज हटकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले कार्य क्रमाचे प्रास्ताविक शांताराम हटकर यांनी केले. तर आभार माजी सरपंच एल के जाधव यांनी मानले. यावेळी वाड्यातील बौद्ध उपासक  उपासनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.