निपाणे परीसरात सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

0

निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : सध्या निपाणे परीसरात सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून पिक पिवळे पडून उभळल्या सारखे दिसू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडले असून सोयाबीनच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्याला शंका येवू लागली आहे. सुरवातीपासूनच हे पिक रोगट व पिवळे दिसत असल्याने बियाणे कंपनिने बोगस बियाणे तर दिले नाही ना? असा ही प्रश्र्न शेतकरी एक मेकांना विचारत आहेत. एक तर निसर्ग शेतकरी वर्गाची अवेलना करत असून कुठे पाऊस पडत आहे तर कुठे हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रासायनिक खतांची पहिली मात्रा देण्यासाठी व्याज ब्याजने पैसे काढून रासायनिक खते घरात आणून ठेवली आहेत परंतु परीसरात काही गावांमध्ये पाऊस पडत नसल्याने खते देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत हवामान खात्याने दोन दिवसांत चांगल्या पावसाचे संकेत वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी निपाणे येथे जोरदार पाऊस झाला मात्र तो पाऊस परीसरात पडलेला नाही त्यामुळे निसर्गाचा असा लहरीपणा शेतकऱ्यांना मारक ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.