निपाणे परीसरातील शेतकरी वर्ग पेरणीत मग्न ; पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : मृग नक्षत्रात दि, १४ जून च्या रात्री पाऊस झाल्याने‌ परीसरात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तसेच कोरडवाहू कपाशी व मका लागवड करतांना दिसत आहेत. सध्या एकाच वेळी पेरणीची धांदल उठल्याने बैल जोडींचे औत भाड्याने मिळणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर यंत्राचा सहारा घ्यावा लागत आहे.

अनेकशेतकरी वर्ग सोयाबीन व मका ट्रॅक्टर यंत्राने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे हवामान खात्याने पाऊस येण्याचे संकेत दिले असून त्या प्रमाणे निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांनी धुळ पेरणी करुन आपले नशीब अजमवले असून निसर्गानेही त्यांचे सोने केले आहे. धुळ पेरणी वर पाऊस झाल्याने पिकांची उगवण चांगली होतांना दिसत आहे यंदा किटक चिमणी पाखरे वान्या यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. असाच पाऊस येत राहिला तर कमी प्रमाणात नुकसान करतील अशी शक्यता आहे आता मान्सून सर्व महाराष्ट्र भर व्यापला असून दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे निपाणे परीसरात दोन दिवसांत पूर्णपणे पेरणी आटोपून बळीराजाला पुढील शेती पिकांचे नियंत्रण करावे लागेल त्यात कोळपणी करणे कपाशी ‌फासणे रासायनिक खतांची पहिली मात्रा देणे निंदणी‌ करणे आदी कामे करावी लागणार आहेत.

सध्यामजूर वर्गाचे दरही वाढले असून पुरुषांना २०० ते २५० रुपये तर महिलांना १२५ ते १५० रुपये रोज द्यावा लागत आहे. तरीही मजूर रोजंदारीने कामे करण्यापेक्षा उधळी कामे करण्याकडे भर देवून मोठी रोजंदारी मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत . त्यामुळे महागडी मजूरी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याचे दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.