नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी दोन लाख रूपयांची मदत

0

जळगाव :- जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपायांमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचा समावेश आहे.

महसुल विभागाला नेहमी प्रत्येक आपत्ती व संकटकाळात अग्रेसर भुमिका बजवावी लागते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुढे येऊन कुठल्याही परिस्थीतीत जबाबदारी पार पाडावी लागते. आरोग्य विभागाबरोबर सुट्टी न घेता गेल्या 3 महीन्यांपासुन सतत महसुल व पोलीस विभागही रात्रंदिवस अखंडपणे सेवा देत आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेसोबतच सामाजीक बांधीलकी म्हणुन दानशुर व्यक्ती पुढे येऊन मदत केल्यास निश्चीतच थोडया कालावधीत जिल्हा कोरानामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु शकेल. हे लक्षात घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून स्वेच्छेने यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले होते.

कृषि विभागाने हे आवाहन स्वीकारुन कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे यांचे नेतृत्वाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांना अर्सेनिक अल्बम 30 या औषधींच्या निर्मीतीसाठी कृषि विभागाचे अधिकारी व कृषि संलग्न निविष्ठा उत्पादक विक्रेते/संघ यांना प्रेरित केले.

यामध्ये जळगाव जिल्हा खते, किटकनाशके, बियाणे डीलर्स असोसिएशनचे, अध्यक्ष श्री. विनोद तराळ व संचालक श्री. शैलेंद्र काबरा यांनी रु. 1 लाख 25 हजार आणि रासायनीक खत उत्पादक संघाचे अध्यक्ष नारखेड व संचालक छत्रपती वानखेडे यांनी रु. 51 हजार तसेच कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी, यावल श्री. आर. एन. जाधव यांनी 13 हजार 500 रूपये, तालुका कृषि अधिकारी, धरणगाव श्री. अभिनव माळी यांनी 5 हजार रूपये, तालुका कृषि अधिकारी पारोळा, एरंडोल, भुसावळ, श्री. ए. पी. वाघ, कृप/ श्री. ए बी देसले, कृषी अधिकारी चाळीसगाव यांनी प्रत्येकी रु 1 हजार स्वेच्छेने मदत केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग तांत्रिक कर्मचारी संघटना, जळगाव यांनी रु 11 हजार धनादेश देऊन सहकार्य केले.

सदरचा निधी संकलनासाठी कृषी विकास अधिकारी श्री. वैभव शिंदे, मोहीम अधिकारी श्री. महाजन व कृषी अधिकारी श्री. शिपी यांचेही सहकार्य लाभले.

मदतीचा धनादेश संबंधितांनी श्री. गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला.

Leave A Reply

Your email address will not be published.