नंदकुमार पाटील व सुनिल पाटील यांचा शिक्षक संघटनांकडून सत्कार

0

पाचोरा (प्रतिनिधी) : जळगांव जिल्हयातुन नाशिक एस.एस.सी. बोर्डवर सदस्य म्हणून नियुकती झाल्याबददल माध्यमिक शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, तथा पारोळासंचालक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जळगांव आणि उपशिक्षक, माध्यमिक विदयालय करमाड ता.पारोळा आणि नगरदेवळा येथील तलावात बुडणाऱ्या 4 मुलांचे प्राण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता  वाचवण्याचे अभिमानास्पद, धाडसाचे काम केल्याबद्दल सुनिल निंबा पाटील मुख्याध्यापक, अहिल्यानगर वस्ती, नगरदेवळा यांचा सत्कार जळगांव येथे शिक्षकसेनेने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात संपन्न झाला. सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या या सत्कार सोहळ्यात  शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष  ईश्वरभाऊ सपकाळे, सरचिटणीस  राधेशाम पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख  संदीप पवार, उपाध्यक्ष  नाना पाटील, वासुदेव चौधरी, समन्वय समितीचे प्रमुख  अजबसिंग पाटील, पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष  डॉ. विजय बागूल, पदाधिकारी  राजीव वानखेडे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष  सोमनाथ पाटील, अजयकुमार पाटील , जळगांव तालूका शिक्षक भारती तालूकाध्यक्ष पंकज गरुड, माध्यमिक शिक्षकसेना पदाधिकारी  गोविंदा पाटील, प्रदीप हिरोळे तसेच एन. एस. ठाकरे, सुनिल येवले, भाऊसाहेब मगर, महेश आनंदराव पाटील व इतर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही सत्कारमूर्तीचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.