धाबे शाळेत राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरा

0

बालिकांना प्रोत्साहन म्हणुन सुंदर पोशाख सप्रेम भेट

पारोळा- आज जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळा येथे राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा ज्योतीराव फुले गुरू गौरव पुरस्कार विजेते गुणवंतराव पाटील यांच्या संकल्पनेतुन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रमाता राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा करण्यात आली . यावेळी शिक्षक विदयार्थी व ग्रामस्थ यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार, फुले अर्पण , पूजन,करून अभिवादन केले . धाबे शाळेत व गावात सण, उत्सव, जयंती व पुण्यतीथी साजरा करतांना युवकांच्या मदतीने अगोदर शाळा व गाव परिसराची साफ सफाई केली जाते . ती या प्रसंगीही करण्यात आली . अशा प्रसंगी शाळेच्या विदयार्थींनी यासाठी लागणारा फुलहार स्वतःच्या हाताने उपलब्ध फुले गोळा करून बनवितात .तसेच या सण ,उत्सव, जयंती व पुण्यतीथी साजरा करण्यामागचा उद्देश व हेतु सफल करण्याचा प्रयत्न शाळा शिक्षकांकडुन केला जातो . आज प्रत्येकाला वाटते या देशात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे त्या अगोदर मात्र राष्ट्रमाता राजमाता जिजामाता जन्माला आल्या पाहिजेत . त्यासाठी बालपणापासुनच त्यांच्यावर ते संस्कार व चरित्र त्यांच्या समोर मांडले पाहिजे . आज आपल्या समाजात माता बघिनी व काही बांधव या बाबत निश्चितच आपले योगदान देत आहेत .

राष्ट्रमाता जिजामातांचे स्मरण व आदर्श जीवनभर राहवेत म्हणुन आज शाळेच्या इ १ ली ते इ ४ थी पर्यंतच्या प्रत्येकी एक नियमित शाळेत येणाऱ्या व सर्व गोष्टीत सहभाग घेणाऱ्या चार विदयार्थीनींना सुंदर असे पोशाख मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी सप्रेम भेट दिले . शाळेत ३ जानेवारी पासुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती पासुन लेक वाचवा लेक शिकवा अभियानही राबविण्यात येत आहे .

या प्रसंगी स्त्री अस्मितेचे प्रतिक व राष्ट्रभक्तीचे ज्वलंत उदाहरण राष्ट्र माता जिजाऊ व प्रखर देशाभिमान व राष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिक स्वामी विवेकानंद यांचे कार्य व जीवन परिचय विदयार्थी व ग्रामस्थ यांना शाळेच्या शिक्षकांनी करून दिला . मयुर शिंपी यांचे सहकार्य लाभले .

Leave A Reply

Your email address will not be published.