धरणगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण

0

धरणगांव : येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला धरणगांव येथील पोलीस निरीक्षक म. अंबादास मोरे साहेब व समाजसेवक म. सुनिल भाऊ चौधरी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाची सुरूवात करण्यात आली.

तसेच संस्थेचे उपाध्यक्ष- हाजी शफी अहमद काझी, चेअरमन – हाजी एहसान हुसेन साकी , अकील अहमद काझी,अविनाश चौधरी,तसेच तौसिफ पटेल यांच्या शुभहस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी म.सुनिल भाऊ चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.