धरणगावात पाच दिवस लॉकडॉउन ; काय सुरु काय बंद राहणार?

0

  धरणगाव : धरणगाव नगर परिषद हद्दीत दिनांक 23मार्च ते 27मार्च २०२१ या कालावधी मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल विभाग यांच्या वतीने धरणगाव येथील बैठकीचा आवाहाल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी धरणगाव  नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दिनांक 23 मार्च वार मंगळवार  ते 27 मार्च 2021 वार शनिवार  या कालावधीमध्ये लॉक डाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा आदेश थोड्याच वेळात निर्गमित होत आहे धरणगाव नगरपालिका हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व्यवसायिक परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी.

 

सदर आदेश हा दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी  धरणगाव शहरातील सर्व आठवडे बाजार बाजारपेठा,किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र,शैक्षणिक संस्था शाळा,महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील तसेच हॉटेल रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी व पार्सल वगळता) सर्व बंद राहील त्याच बरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन,पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे,पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील.असे आव्हान प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी केले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डॉ सोनवणे, डॉ गिरीष चौधरी न पा कर निरीक्षक प्रणव पाटील, व्यापारी असोसिएशन चे मंगलदास भाटीया संजय कोठारी  शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन , भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन कॉग्रेस चे विकास लाबोळे चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे भाजीपाला असोसिएशन भगवान महाजन, पत्रकारबंधू,  प्रतिष्ठितनागरिक लहान मोठे व्यापारी ,सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.