देशात कोरोनाचा कहर सुरूच ; गेल्या २४ तासांत १.३१ लाख रुग्ण, ८०० हून अधिक मृत्यू

0

नवी दिल्ली : कोरोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसतंय. गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येनं लाखांचा टप्पा पार केलेला दिसतोय. आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १ लाख ३१ हजार ८७८ करोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ८०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल १० लाखांजवळ पोहोचला आहे. सध्या हा आकडा ९.७४ लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात करोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रा दिसत असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण होत आहे. गुरूवारीही महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७,५०० रुग्णांची भर पडली. दिल्ली-महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्येही करोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. करोनाचा शिरकाव झाल्यापासून हा उत्तर प्रदेशमधलाही सर्वाधिक आकडा असल्याचं समजतंय.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ३० लाख ५७ हजार ९५३

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी १९ लाख १० हजार ७४१

उपचार सुरू : ९ लाख ७४ हजार २३३

एकूण मृत्यू : १ लाख ६७ हजार ६९४

करोना लसीचे डोस दिले गेले : ९ कोटी ४० लाख ९६ हजार ६८९

Leave A Reply

Your email address will not be published.