दिल्ली येथून बालकाचे अपहरण,अपहरणकर्ता भुसावळात जेरबंद.

0

भुसावळ- नवी दिल्ली येथून एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण करून घेऊन जाणाऱा एक अपहरणकर्ता भुसावळ रेल्वे स्थानक आरपीएफ विभागाच्या सतर्कतेने जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

नवी दिल्ली येथील आरपीएफ केंट स्थानकाचे निरीक्षक शिवजी चौधरी व नवी दिल्ली विंदयुर पोलीस ठाण्याचे पोउपनि करतार सिंह यांनी भुसावळ आरपीएफला नवी दिल्ली येथील शुभम संतोष साहनी या ६ वर्षीय बालकाचे अपहरण झाले असुन ते मुंबईकडे निघाल्याचे सांगत वर्णन सांगितला होता. त्यादृष्टीने भुसावळ रेल्वे स्थानक आरपीेएफचे उपनिरीक्षक लवकुश वर्मा व कॉन्स्टेबल आे.पी.मालवीया यांनी संशयावरून ११०७२ कामायनी एक्सप्रेसचया इंजिन जवळील सर्वसाधारण त्याची तपासणी केली असता त्यांना संशयास्पदरीत्याल बालक व तरूण दिसला. दोघांना त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व विचार व याबाबत दिल्ली पोलिसांची फोटो काढून पाठविला दोघ ओळख पटली आजचा ओळख पटली. नाव वापरकर्त्याचे नाव गुड्डू किशोरी साहनी(वय २२) हे असून तो नवीदिल्ली येथील बुद्ध बाजार भागातील रहिवासी आहे. अपहरणकर्ता व बालक या दोघांना आरपीएफने ताब्यात घेतले असून दि.९ रोजी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.