दिलासादायक ! जिल्ह्यात सलग सहावा दिवशी नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या विळख्यात आजचा सलग सहावा दिवस दिलासा देणारा ठरला. आजही नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. दिवसभरात ४४६ नवे रुग्ण आढळून आले असून ८०३ जणांनी कोरोनावर मात केली. तर गेल्या २४ तासांत ०४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आठवडाभरातील दररोजच्या मृत्यूसंख्येतही घट आली.

असे आढळले रुग्ण 

जळगाव शहर १४०, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५५, अमळनेर ११, चोपडा ५३, पाचोरा ७, भडगाव१४, धरणगाव २४, यावल ५, एरंडोल ५, जामनेर २२, रावेर ११, चाळीसगाव २८, पारोळा १०, मुक्ताईनगर १९, बोदवड ०७, अन्य जिल्ह्यातील ९.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. सहा दिवसांपासून तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे. आज प्राप्त अहवालानुसार ८०३ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३५ हजार १७८ वर पोचला असून रिकव्हरी रेट वाढून ७७.४४ टक्के झाला आहे. दुसरीकडे नव्या ४४६ बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ४५ हजार ४२९ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा ११२९ एवढा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.