दिलासादायक : जिल्ह्यात आज नव्या रुग्णांची संख्या २०० च्या आत

0

जळगाव : जिल्ह्यातील रुग्ण वाढीला मागील गेल्या काही दिवसापासून ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात आज गुरुवारी दिवसभरात १९४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज
२१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आज १९४ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात बाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९ हजार ३३१ वर गेली आहे. तर १ लाख ३० हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-२२, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-१५, अमळनेर-०, चोपडा-११, पाचोरा-५, भडगाव-१, धरणगाव-५, यावल-२१, एरंडोल-७, जामनेर-१३, रावेर-२० पारोळा-२, चाळीसगाव-३४, मुक्ताईनगर-५, बोदवड-१३ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.