दहावीचा आज निकाल

0

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शनिवार, दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाने सन २०१५मध्ये ८ जून, २०१६मध्ये ९ जून, २०१७मध्ये १३ जून, २०१८मध्ये ८ जूनला निकाल जाहीर केला होता. बीएसएनएल ग्राहकांना ‘MHSSC (स्पेस) सीट नंबर’ टाकून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस करून निकाल मिळवता येईल. 

या वेबसाइटवर पाहा निकाल:

maharashtraeducation.com 

mahresult.nic.in 

mahahsscboard.maharashtra.gov.in 

Leave A Reply

Your email address will not be published.