‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’; खडसेंचा भाजपाला इशारा

0

मुंबई: गेले अनेक दिवस चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, प्रवेश करतेवेळी खडसे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या पाठीमागे ईडी लावली जाईल. त्यावेळी तुम्हा काय करणार, असा सवाल करण्यात येत होता. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश दिला त्यासाठी मी शरद पवार यांचा आभारी आहे. आयुष्यातील जवळपास 40 वर्षे भाजपच्या उभारणीसाठी काम केलं. त्यामुळे स्वाभाविक आहे जेथे 40 वर्षे राहिलं तो पक्ष एकाएकी सोडावा वाटला नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

 

४० वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचे, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचे आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केले नाही. आज चार दिवसापूर्वी भाजपमध्ये आले, ते मला सांगू लागले. तुम्ही आमचे सल्लागार आहात.  ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिले पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर भाजपचे लोक देऊ शकले नाही, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

 

मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.