तिवसा येथील नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी काळ्‍या फिती लावून केले कामकाज

0

अमरावती (प्रतिनिधी) :  नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या विषयी शासन सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे 1 एप्रिल 20 21 रोजी प्रथम टप्प्यात सर्वत्र काळ्या  फिती लावून आंदोलन करण्यात आले असुन तिवसा येथील नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा 1 एप्रिल रोजी काळ्या फिती लावून कामकाज करीत आंदोलन करून निषेध नोंदविला.

नगरपंचायतचे पाणीपुरवठा कामगार , सफाई कामगार आदींसह सर्व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने पेन्शन मिळत नसल्यामुळे .तसेच कामगारांच्या काही प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आज सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काळ्या  फिती लावून कामकाज केले. यावेळी तिवसा नगरपंचायत चे कर्मचारी सुधीर विघ्ने, दीपक खोब्रागडे ,अभिजित गौरखेडे, निखिल वानखडे, संजय लढे, सचिन मकेश्वर , आदी उपस्थित होते . व यानंतर 15 एप्रिल 1 मे रोजी सुद्धा पुढील दोन टप्प्यात हे आंदोलन होणार असल्याचे त्यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.