तळेगाव येथे शाळा खोलीचे व गावरस्त्याच्या कामांचे भूमिपूजन

0

जामनेर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील तळेगाव येथे विविध विकासकामाचे भूमिपूजन जि प सदस्य राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . प्रथम जि प प्राथमिक शाळा खोलीचे भूमिपूजन करण्यात आले .तळेगाव येथील जि प शाळेला शाळा खोल्या कमी असल्याने व तालुक्यातील एकमेव शाळा अशी आहे की ती दोन सत्रात भरत असते .ही बाब गावातील नागरिकांनी व सरपंच यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर टाकली, त्यांनी शाळा खोली देण्याचे आश्वासन दिले होते. व ते पूर्ण देखील केले असून सदर कामाचे आज जि प सदस्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच शेतीसाठी व तळेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय च्या विहिरी कडे जाणाऱ्या  रस्त्याची दुरवस्था झालेली होती. त्या रस्ता दुरुस्तीसाठी देखील मंजुरी मिळाली असून त्या रस्त्याचे देखील भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राजू माळी, भास्कर सानप ,राजेश लोढा ,प्रशांत वाघ, नंदू पाटील, जगन नाईक, युवराज जाधव, ,अजय चोरडिया, ज्ञानेश्वर माळी, महारु नाईक, अरुण कोळी, गजानन जाधव,योगेश गोरे, ईश्वर बंजारी ,आकाश जैन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाघ ,मनोज राजपूत गजानन कोळी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.