टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर ; प्रा.धिरज पाटील

0

भुसावळ :- टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात, किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता १ वर्षांत होतो. स्मार्ट फोनसारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे.

जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाऱ्या पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ञ प्रा. धिरज पाटील यांनी दि. १७ मे “जागतिक दूरसंचार दिवसा”निमित्त श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागात आयोजित ५ जी तंत्रज्ञानावावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. त्यांनी फोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या ५ जी तंत्रज्ञानचा एक भाग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरवर मार्गदर्शन केले. तर नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे बदल व फायदे प्रा.गजानन पाटील यांनी सांगितले.

दोन सत्रात चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातील विभागप्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दिपक साकळे, प्रा.धिरज पाटील, श्री. नितीन पांगळे ह्या आठ तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

असा आहे नवीन प्रोसेसर

क्वालकॉमचा नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सादर झाला असून २०१९ मधील सर्व मोठ्या फोन्समध्ये हा प्रोसेसर पाहायला मिळेल! SD845 नंतर आता हा SD855 5G तंत्रज्ञानासह सज्ज असून हा फ्लॅगशिप प्रोसेसर २०१९ मधील फोन्स ५ जी इंटरनेटवर घेऊन जाईल. हा प्रोसेसरचा चिपसेट आता ५ जी इंटरनेट तंत्रज्ञानाची लाट आणायला सुरुवात करेल.

क्वालकॉमचे प्रोसेसर्स आता जवळपास सर्वच प्रमुख अँड्रॉइड फोन्समध्ये बसवलेले असतात. काही प्रमाणात थोड्या मॉडेल्सवर मीडियाटेकचे प्रोसेसर्स असतात. ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन क्वालकॉमने इतरांच्या मानाने आधीच आघाडी घेतली आहे. हा नवा प्लॅटफॉर्म मल्टी गिगाबिट डाउनलोड स्पीड देऊ शकेल.

या नव्या प्रोसेसरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून हे प्रोसेसर आधीच्या प्रोसेसर्सच्या मानाने तिप्पट अधिक चांगली कामगिरी करू शकतील! आपण फोटो काढत असलेली वस्तू काय आहे हे सांगण्यापर्यंत याची बुद्धिमत्ता काम करेल! चिपमध्ये गेमिंग व ऑगमेंटेड रियालिटी अनुभव सुद्धा सुधारण्यात आला आहे. नवा प्रोसेसर 7nm पद्धतीने बनवला जाईल. सोबतच क्वालकॉमने त्यांच्या डिस्प्लेखाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्याच्या सोयीचं नाव अल्ट्रासॉनिक हे बदलून 3D सॉनिक सेन्सर असं केलं आहे अशी माहिती प्रा.पाटील यांनी दिली.

नवीन तंत्रज्ञानाचे फायदे-प्रा.गजानन पाटील

टेलिकॉम क्षेत्राने लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आणले आहे. आता छोटया गावातील व्यापाऱ्याचे जगभर ग्राहक आहेत आणि ते ऑनलाइन उत्पादनांची विक्री करीत आहेत. छोट्या गावातील लोक विशेषत: ब्रॅण्डच्या गुणवत्ता उत्पादनांचे ऑर्डर करू शकतात जे त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध नाहीत. अगदी लहान व्यापारी, हस्तकला व्यापारी, स्थानिक सेवा प्रदाते स्वत: साठी बाजार शोधण्यासाठी वॉट्सप, हाइक, फेसबुक इत्यादी मोबाइल अनुप्रयोग वापरतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्स, बीपीओ आणि व्यवसाय संधी वाढविण्यासारख्या उद्योगांच्या निर्मितीत वेगाने वाढ होईल.

महामार्ग, सर्वत्र मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट प्रवेश कार्यक्रम, ई-शासन, ई-क्रांती (ज्याचा उद्देश इलेक्ट्रॉनिक सेवा देण्यासाठी आहे), सर्व माहिती क्षणात उपलब्ध होईल व या सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील अशी माहिती प्रा.गजानन पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.