जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज २६७ रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्‍ह्‍यात सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक अजून थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज दिवसभरात कोरोनाचे नवे २६७ रूग्‍ण आढळून आले आहे.त्यात जळगाव शहरात सर्वाधिक ८६ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा १० हजार ५८५ वर पोहचला आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ८६, जळगाव ग्रामीण २३, भुसावळ ०८, अमळनेर ०४, चोपडा १६, पाचोरा १८, भडगाव ०७, धरणगाव ०९, यावल १२, एरंडोल ०५, जामनेर ३४, रावेर ०२, पारोळा १५, चाळीसगाव २८.

मागील गेल्या काही दिवसांपासून जिल्‍ह्‍यातून मृतांचा आकडा रोज दहाच्या वर येत आहे. आज दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासह मृत्‍यूचे प्रमाण रोखण्याचे आव्हाण देखील आता प्रशासनासमोर उभे आहे.

दिलासादायक बाब म्हणजे की, आज दिवसभरात २७१ रूग्ण बरे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.