जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : आज १२०१ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव  । जिल्ह्यात आज पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १२०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ११९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ३ हजार ०९ इतकी झाली आहे. त्यात बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ४६० वर गेली आहे. आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १८०९ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७४० रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २१३, जळगाव तालुका ३३, भुसावळ १२४, अमळनेर २२०; चोपडा १०४; पाचोरा ६९; भडगाव १५; धरणगाव ३६; यावल ६६; एरंडोल ८१, जामनेर ३३; रावेर १२२, पारोळा ०९; चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ५६; बोदवड ०९ आणि इतर जिल्ह्यातील ०७ असे १२०१ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.