जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक थांबेना ; आज ७५३ नवीन रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज ७५३ नवीन रूग्ण आढळून आले आहे.यात सर्वाधीक ११५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल पारोळा ९६, अमळनेर-८७ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ६८६ वर गेला आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-१९; भुसावळ-५०; पाचोरा-२६; भडगाव-४२; चोपडा ७४; धरणगाव-२७; यावल-३८; एरंडोल-०९; जामनेर-३८; रावेर-१४; चाळीसगाव-५८; मुक्ताईनगर-२७; बोदवड-१८ व बाहेरच्या जिल्ह्यातील ५ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज ५१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्‍या रूग्णांचा आकडा २१ हजार ३४३ पार गेला आहे. तर आज दिवसभरात ०९ मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या ८४० इतकी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.