जामनेर विधानसभा क्षेत्रात बुथ व पेज प्रमुखांच्या बैठका संपन्न

0

जामनेर : – येथील विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख व पेज प्रमुख यांच्या बैठका मोठ्या उत्साहात संपन्न होत असून त्यामध्ये केंद्र सरकार व राज्य शासन राबवित असलेल्या लोकाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.

माळपिंप्री,सुनसगाव,मोहाडी,करमाड,हिंगणे,पाळधी, पळासखेडा मिराचे,टाकरखेडा,सामरोद, शहापूर,तळेगाव आदि गावांसह तालुक्यातील विविध गावांमध्ये बुथ व पेज प्रमुखांच्या बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकींना पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. शिवाजी सोनार,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,विस्तारक नवलसिंग राजपूत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरपरिषदेचे गटनेते महेंद्र बाविस्कर,नगरसेवक प्रा.शरद पाटील,पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील,राजेश पाटील,आण्णा पिठोडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर काळे,हिंगणेेेेचेे उपसरपंच सुुुुपडू बावस्कर,नाना पाटील,समाधान पाटील यांच्यासह बुुथ व पेज प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.