जामनेर येथील फडणवीसांच्या सभास्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी

0

जामनेर : येथे भाजपचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्लोबल हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण, या कार्यक्रमाच्या सभास्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी देऊन 1 कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मंगळवारी  ग्लोबल महाराष्ट्रा मल्टीपर्पज हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार, आमदार आणि अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना कॉल व मेसेजचा माध्यमातून धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.