जामनेर पालिकेच्या ऑनलाईन मासिक सभेत २० विषयांना मंजुरी

0

कोरोना काळातील पहिलीचसभा यशस्वी

जामनेर(प्रतिनिधी):- कोरोना संसर्गाच्या काटेकोर नियमावलीमुळे सुमारे चार महीण्यांपासुन पालीच्या मासीक सभाही होऊ शकल्या नव्हत्या,मात्र काल (६) नगरपालीकेची ऑनलाईन मासीक सभा पार पडली. ई-प्रणालीद्वारा पार पडलेल्या मासीक सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या, त्यांनी आपल्या निवासस्थानातुनच सभेच्या कामकाजात सहभाग घेतला.या सभेत सुमारे २० विषयांना मंजुरी देण्यात आली.यावेळी बहुतांश नगरसेवकांनी आप-आपल्या घरातुन/संपर्ककार्यालयातुन सहभाग घेतला.मुख्याधिकारी व प्रमुख अधीकाऱ्यांनी पालीका कार्यालयातुनच कामकाज हाताळले.

सभेतील महत्वाचे काही विषय
कोरोना काळात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना अतीरीक्त भत्ता देण्याबाबत, सन २०२०-२१ मधील चतुर्थकर कोरोना काळात आकारणीबाबत,पाणीपुरवठा योजनेच्या व्याजाच्या रकमेतुन शहरातील रस्ते दुरूस्ती करणेबाबत, भुयारी गटार,गांधीचौक ते जुना बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे कामांसह अन्य विकासकामांचा आजच्या मासीक सभेत समावेश करण्यात आला आहे.
आजच्या ऑनलाईन सभेला उपनगराध्यक्ष अनीस शेख, गटनेते डॉ प्रशांत भोंडे,बांधकाम सभापती संध्या पाटील,महेंद्र बावीस्कर, आतीष झाल्टे, शितल सोनवनणे, मंगला माळी, लिना पाटील, नाजीम शेख,रिजवान शेख, किरण पोळ आदींचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.