जळगाव मनपा आयुक्तपदी सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती

0

जळगाव : येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी हे मुंबई नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक आहेत.

तत्कालीन अायुक्त डाॅ. उदय टेकाळे ३१ जानेवारी राेजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याकडे साेपवला हाेता. दरम्यान १२ फेब्रुवारी राेजी पालिका अायुक्तपदी अायएएस डाॅ. माधवी खाेडे -चवरे यांच्या नियुक्तीचे अादेश पालिकेला प्राप्त झाले हाेते. परंतु ३० दिवस उलटले तरी त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती केली अाहे. सेवानिवृत्तीला दीड वर्ष शिल्लक असलेले कुलकर्णी पुढच्या अाठवड्यात अायुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.